बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीचे विभाग आणि सेल बरखास्त

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसनेतील (Shivsena) बंडाळीनंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं. राजकीय हालचालींना वेग आलेला असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीचे (NCP) सर्व विभाग व सेल तातडीने बरखास्त करण्याचे निर्देश शरद पवारांनी दिले आहेत. शरद पवारांच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग व सेल बरखास्त करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचं याबाबतचं एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या पत्रात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल तातडीने बरखास्त केल्याची घोषणा केली आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनेच हा निर्णय घेण्यात आल्याचं देखील या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, राष्ट्रीय पातळीवरील सेल व विभाग बरखास्त करण्याचे आदेश शरद पवारांनी दिले आहेत. तर राज्यातील सेल आणि विभागाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, शरद पवारांनी इतक्या तातडीने हा निर्णय का घेतला?, याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘या’ नऊ राज्यात कोरोनाचा फैलाव वाढतोय, केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्ट मोडवर

“देवेंद्र फडणवीस जे बोलले ते त्यांनी सत्तेत येताच केवळ 20 दिवसात करून दाखवलं”

“ओबीसी आरक्षण तुम्ही मिळवून दिलं म्हणताय तर मग आता धनगर आरक्षणही द्या”

‘…तर महिन्याला 5000 रूपये पेंशन मिळेल’; सरकारची भन्नाट योजना

‘उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर…’; पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More