शिवरायांचं पुस्तक मोफत वाटतो म्हणून तरुणाला बेदम मारहाण!

पुणे | छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचं मोफत वाटप करतो म्हणून मंचरमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलीय. शरद पोखरकर असं या तरुणाचं नाव असून तो मराठा क्रांती मोर्चाचा पुणे संघटक आहे. 

शरद पोखरकर गेल्या काही वर्षांपासून कॉ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचं वाड्या-वस्त्यावर जाऊन मोफत वाटप करत आहे. यावरुन बजरंग दलाच्या 40 ते 50 कार्यकर्त्यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा पोखरकर यांचा आरोप आहे. पोखरकर यांच्यासह आणखी दोघांनाही मारहाण करण्यात आलीय.  

याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात बजरंग दलाचा कार्यकर्ता रोहित ढुमणे, स्वप्नील शिंदे, संजय शिंदे, स्वप्नील भोर यांच्यासह 50 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी वैभव शिंदे आणि प्रकाश शिंदेला अटक केलीय.