…म्हणून ‘त्या’ महिलेनं बलात्कार झाल्याचा बनाव रचला!

पुणे | शिंदवणे घाटात महिलेवर बलात्कार झालाच नाही, तो चक्क बनाव होता. पूर्ववैमनस्यातून दोघाजणांनी महिलेच्या मदतीनं हा बनाव रचल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. 

प्रकाश चव्हाण आणि अजय नवले या दोघांना तुरुंगात पाठवण्यासाठी दादा गव्हाणे आणि संदीप जगदाळे यांनी महिलेच्या मदतीनं हा बनाव रचला होता. महिलेच्या जबाबातील विसंगतीमुळे ही बाब उजेडात आली. 

दरम्यान, याप्रकरणात २ साक्षीदार होते. त्यांनाही पैसे देऊन आणल्याचं निष्पन्न झालंय. 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या