बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनेच्या दळिद्री पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची सफरचंद चोरून खालली”

मुंबई | महाविकास आघाडीतर्फे लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. महाराष्ट्र बंदच्या मुद्द्यावरून भाजप आणि सत्तधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध चांगलंच रंगलं आहे. राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वाद या निमित्तानं पुन्हा राज्याला पहायला मिळाला आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी महाराष्ट्र बंदवरून शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये ही छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञा होती पण आजच्या दिवशी मालवणात शिवसेनेच्या दळिद्री पदाधिकाऱ्यांनी एका शेतकऱ्याची सफरचंद चोरून खालली, अशी जहरी टीका निलेश राणे यांनी केली आहे. काही तरी लाज राखा वाझेंच्या औलादींनो, शिवाजी महाराज असते तर पाठीवर चाबकाचे कोरड ओढले असते, या शब्दात निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

नितेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केल्याचं पहायला मिळालं आहे. नुकतचं चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर होते. या दोन्ही नेत्यांच्या एकाच व्यासपिठावर येण्यानं यांच्यातील राजकीय वैर संपेल असं वाटत होतं पण निेतेश राणे यांच्या या वक्तव्यानं वाद मिटणार नाही तर वाढणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीनं पुकारलेल्या बंदला राज्यातील भाजप नेत्यांनी जोरदार विरोध केल्याचं पहायला मिळालं आहे. सिधुदुर्ग हा राणे आणि शिवसेनेतील भांडणाचं प्रमुख कारण आहे. या जिल्ह्यावर पकड ठेवण्यासाठी राणे आणि शिवसेना नेते यांच्यात नेहमीच रस्सीखेच पहायला मिळत असते. नितेश राणे यांनी आता सुद्धा आपल्या खास शैलीत शिवसेनेवर टीका केली आहे.

पाहा ट्विट 

 

थोडक्यात बातम्या 

देशातील अशिक्षित नागरिक देशावरील ओझं आहेत – अमित शहा

“लखीमपूरसारखी कोणाकडे जीप असेल तर, त्यांनी बाहेर काढून दाखवावी”

…म्हणून ‘त्या’ निर्णयाला अजित पवारांचा विरोध; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

“मला पक्षातून काढण्याची कोणाचीही हिंमत नाही, ही केवळ राजकीय लढाई”

यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार ‘या’ तीन अर्थशास्त्रज्ञांना जाहीर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More