“भाजपचं हिंदुत्व मतलबी आणि तकलादू असल्याचं आता स्पष्ट झालंय”
मुंबई | जेएनयू (JNU) विद्यापीठात मांसाहारी जेवणावरून भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. याच घटनेचा उल्लेख करत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून (Saamana) भाजपवर टीका करण्यात आली आहे. भाजपचे नवहिंदुत्ववादी देशात फाळणीपूर्व परिस्थिती निर्माण करू पाहत आहेत, असा घणाघात शिवसेनेने (Shivsena) केला आहे.
भाजपचे लोक महागाईवर बोलत नाहीत. ते खाण्यावरून देशात हिंसा घडवण्याचं काम करत आहेत, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात मांसाहारावरून वाद झाला. मात्र, भाजप त्या वादात रामाला ओढत आहे, असा हल्लाबोलही सामनातून करण्यात आला आहे.
निवडणुका जिंकण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्यापासून ते दंगली घडवण्यापर्यंत या लोकांचा हात आहे. एका बाजूला अखंड हिंदुत्वाचे गिरमिट चालवायचे आणि दुसऱ्या बाजूला धर्मात तेढ निर्माण करून देशाचे तुकडे होतील असं वातावरण निर्माण करायचं. भाजपचं हिंदुत्व मतलबी आणि तकलादू असल्याचं आता स्पष्ट झालंय, अशी खोचक टीका सामनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, बेरोजगारांचे लक्ष इतरत्र योग्य पद्धतीने वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपचं हिंदुत्वाशी काही देणंघेणं नसून भाजप हिंदू आणि मुस्लिम यांच्यात भांडण लावायचं काम करत आहे, असा आरोप देखील शिवसेनेने केला आहे.
थोडक्यात बातम्या-
नोकरीची सुवर्णसंधी! आयटी क्षेत्रातील ‘ही’ नामांकित कंपनी देतेय तब्बल 60 हजार नोकऱ्या
“किरीट सोमय्या असं कॅरेक्टर जे महाराष्ट्रात फक्त भोंगा घेऊन बोंबलतं”
तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहिर, वाचा आजचे दर
“आता भाग सोमय्या भाग चित्रपट काढावा”; राऊतांचा खोचक टोला
“पन्नास लाखांच्या घड्याळात ज्यांचं टायमिंग चुकलं ते आता…”
Comments are closed.