बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! शिवसेना कार्यकर्त्यांनी केली युवासेना पदाधिकाऱ्याला मारहाण

मुंबई | शिवसेना आणि युवासेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं चित्र काल मुंबईत पाहायला मिळालं. युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली आहे. युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई कल्याणमध्ये दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान ही घटना घडली आहे.

युवासेनेतील पदासाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती वरूण सरदेसाई यांनी घेतल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत युवासेनेचे नेते दिपेश म्हात्रे हे देखील होते. दरम्यान, कल्याण पुर्वेतील कोळसेवाडीच्या शिवसेनेच्या शाखेत या मुलाखती पार पडल्या. यावेळी वरूण सरदेसाई आणि दिपेश म्हात्रे यांना भेटण्यासाठी युवासेना पदाधिकारी संजय मोरे हे तिथे आले होते.

वरूण सरदेसाई यांची भेट घेऊन मोरे हे परत जात असताना शिवसेनेच्या शाखेमागे त्यांना नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप संजय मोरे यांनी केला आहे. या मारहाणीत मोरे यांच्या पोटाला आणि कानाला दुखापत झाली आहे आणि त्यांनी या प्रकरणात कोेळसेवाडी पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

पक्षश्रेष्ठींकडे मोरे यांनी न्यायाची अपेक्षा केली आहे. या प्रकरणात चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया वरूण सरदेसाई यांनी दिली. शिवसेना आणि युवासेनेतील अंतर्गत कलह बाहेर आल्याने आता अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. तसेच आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अशाप्रकारचे वाद पुढे येऊ लागल्याने यामध्ये काही राजकीय हेतू तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

 

थोडक्यात बातम्या

ड्रग्स प्रकरणात आर्यन खानसह ‘या’ सात जणांना तुरूंगाची हवा!

आयपीएलच्या इतिहासातील सगळ्यात खराब बॉल, धोनीही झाला थक्क, पाहा व्हिडीओ

दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

‘माझी पत्नी मला म्हणाली नाशिक किती…’; गडकरींनी सांगितला ‘तो’ खास किस्सा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More