बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक ! वाढदिवसाच्या दिवशीच ‘या’ अभिनेत्रीचा मृत्यू

तिरुवनंतपुरम | चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच अभिनेत्रीनं अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे कलासृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

केरळमधील मॉडेल आणि अभिनेत्री सहानाचा वाढदिवसादिवशी मृत्यू झाला. तिनं 12 मे ला आपला 21 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाला तिच्या मृत्यूची बातमी तिच्या कुटुंबाच्या कानावर पडली, त्यामुळे कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे.

सहानाच्या नवऱ्यानं तिनं आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. तर तिच्या कुटुंबानं तिची हत्या झाली असून हत्या तिच्या नवऱ्यानं केली असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पोलीस याप्रकरणी आणखी चौकशी करत आहेत.

दरम्यान, सहानानं अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. त्यानंतर तिनं दीड वर्षांपूर्वी तिने साजिदशी लग्न केलं. त्यामुळे आता याप्रकणी काय माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘या’ ठिकाणी इमारतीला भीषण आग, अनेकजण जखमी

शिवाजी महाराजांचा अजेंडा हिंदू साम्राज्य स्थापन करण्याचा होता- कालीचरण महाराज

मोठी बातमी ! शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला दोन वर्षांची शिक्षा

मोठी बातमी ! रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली समोर

राज्यात कुठेच भारनियमन नाही, यापुढेही होणार नाही- ऊर्जा मंत्री नितीन राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More