बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! महिला डाॅक्टरला तब्बल तीन वेळा झाली कोरोनाची लागण

मुंबई | देशातील बहुतांश राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका आणखी टळलेला नाही. कोरोना विषाणूच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या समोर येत असतात. अशातच आता मुंबईमध्ये एका महिला डॉक्टरला 3 वेळा कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. 

मुंबईमधील एका महिला डॉक्टरला गेल्या 14 महिन्यात तीनदा कोरोना झालाय. डॉ. सृष्टी हलारी असं महिला डॉक्टरचं नाव असून ती 26 वर्षाची आहे. विशेष म्हणजे लस घेतल्यानंतरही दोन वेळा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. या बरोबरच डॉक्टरच्या संपूर्ण कुटूंबालाही कोरोनाची लागण झाली. या डॉक्टरसह कुटुंबातील सदस्यांनीही कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

कोरोना संसर्ग पुन्हा होण्याचा धोका 4.5 टक्के आहे. जर एखाद्याला 102 दिवसांच्या अंतरानं संसर्ग झाला असेल तर तो नवीन संसर्ग मानला जातो. त्याचवेळी, लस घेतल्यानंतरही जर कोणाला संसर्ग झाला तर त्याला ब्रेक थ्रू इन्फेक्शन म्हणतात, असं मत इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चनं व्यक्त केलं आहे.

दरम्यान, सध्या कोरोना विषाणूचे नवनवीन व्हेरिएंट समोर येत आहेेत. कोरोना विषाणूच्या या बदललेल्या स्वरुपामुळे देशाला कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं असं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या –

“ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर….”

पुणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून सुरु होऊ शकते मेट्रो

नव्या कोरोना व्हायरसचं रहस्य उलगडलं; ‘माणसाच्या शरिरात गेल्यावर…’

नोकरीची बातमी | 1 लाख भारतीयांना ‘ही’ दिग्गज आयटी कंपनी देणार नोकरी

‘…म्हणून राज कुंद्राला अटक केलं’; मुंबई पोलिसांनी सांगितलं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More