शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमचा निवडणुकीसाठी अर्ज दाखल

अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या श्रीपाद छिंदमने अखेर निवडणुकीचा अर्ज दाखल आहे. छिंदम ही निवडणूक अपक्ष म्हणून लढणार आहे.

छिंदमने प्रभाग 9 मधून नगर पालिकेचा अर्ज भरला आहे. अनेकांचा विरोध असतानाही छिंदमच्या उमेदवारीवर राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मागच्या महिन्यापासून छिंदम या प्रभागात तयारी करत आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल घरोघरी जावून माफी मागत आहे. आपण नागरिकांच्या कामासाठीच त्या कर्मचाऱ्याला बोललो, असं सांगत आपली बाजू सावरत आहे. 

दरम्यान, छिंदम निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ही चर्चा होती. आता त्याने अर्ज भरल्याचे समजताच सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-नेहरूंमुळेच चहावाला पंतप्रधान झाला म्हणणाऱ्यांना मोदींचं उत्तर

-तुरूंगात असताना भाजपनं तुम्हाला तिकीट दिलं अन् निवडून आणलं!

-तृप्ती देसाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी!

-1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेटसक्ती!

-फक्त ‘भारतमाता की जय’ बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नाही!