पंड्या व राहुलच्या जागी ‘या’ दोन खेळाडूंना मिळणार भारतीय संघात संधी

मुंबई | ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलवण्यात आलेल्या हार्दिक पंड्या आणि के एल राहुल यांच्या जागी आता शुभमन गिल व विजय शंकर यांना संघात संधी देण्यात आली आहे.

‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर बीसीसीआयने निलंबनाची कारवाई केली आहे.

विजय शंकर हा तात्काळ ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. तर शुभमनची 23 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय व टी-20 सामन्यांसाठी निवड झाली आहे.

दरम्यान, त्या दोघांच्या चौकशीसाठी सहा जणांची समिती नेमण्यात आली आहे. असून ही चौकशी अजून काही काळ चालली तर ते दोघे यंदाच्या विश्वचषकाला मुकू शकतात.

महत्वाच्या बातम्या-

-सरकारचं नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही, उद्या नाक दाबणार- मनसे

-… म्हणून काँग्रेसने चक्क पतंगावरच छापले राफेल प्रकरणाचे प्रश्न!

-केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीनंच फुंकलं वडिलांविरोधात निवडणुकीचं रणशिंग

-“सवर्णांना दिलेलं 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकणार का”??

-“बाबा तुम्ही राबडी देवींची माफी मागा”