नवज्योत सिद्धूंना माझ्याजागी मुख्यमंत्री व्हायचं आहे- पंजाबचे मुख्यमंत्री

नवज्योत सिद्धूंना माझ्याजागी मुख्यमंत्री व्हायचं आहे- पंजाबचे मुख्यमंत्री

चंदीगड | लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालप्रमाणे पंजाबमध्येही पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत.

सिद्धूंना माझ्या जागी मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून ते नेहमी चुकीची वक्तव्य करत असतात, असा आरोप अमरिंदर सिंग सिद्धू यांच्यावर केला आहे.

सिद्धू महत्वकांक्षी आहे, हे ठीक आहे. लोक महत्वकांक्षी असतात. मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. त्यांच्यासोबत माझे कोणतेही वैयक्तीक मतभेद नाहीत, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

राजकीय महत्वकांक्षा मोठी असल्याने त्यांना माझ्या जागी मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून माझ्यावर ते कोणतेही आरोप करतात. काँग्रेसने याबाबत त्यांच्यावर कारवाई करायला हवी, असंही अमरिंद सिंग म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या

-“रावसाहेब दानवेंनी आपल्या लायकीनुसार काम करावं”

पश्चिम बंगालमध्ये बाबुल सुप्रियो यांना तृणमूल समर्थकांचा घातला घेराव

-इंदापुरातून सुळेंनाच आघाडी; दिलेला शब्द पाळण्याची काँग्रेसकडे परंपरा- हर्षवर्धन पाटील

-मोदींनंतर साध्वींवर नितीश कुमारही नाराज

-बंगालमध्ये तुफान राडा, भाजप उमेदवाराच्या गाडीची तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

Google+ Linkedin