बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी एका क्लिकवर

नवी दिल्ली | देशातील कोरोनाबाधितांची (India Corona) संख्या गेल्या काही महिन्यात सतत वाढत असताना आता हळूहळू ही रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच कोरोनाबाधितांच्या (Corona Update)  संख्येतही दिवसेंदिवस मोठ्या घट होत आहे. त्यामुळे दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. Omicronने सध्या देशाची चिंता वाढवली आहे.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 93,277 वर पोहचली आहे. गेल्या 559 दिवसातली सर्वात कमी संख्या आहे. उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 1% पेक्षाही कमी आहे. सध्या हे प्रमाण 0.27% आहे. मार्च 2020 पासून हे सर्वात कमी प्रमाण आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.36% आहे. मार्च 2020 पासून सर्वाधिक गेल्या 24 तासात 9,265 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून एकूण 3,41,14,331 वर आली होती. गेल्या 24 तासात 7,992 नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्हिटी दर हा 0.64% आला आहे. गेल्या 68 दिवसांपासून 2% पेक्षा कमी आहे.

देशभरात लसीकरण मोहीम (Vaccination Drive) मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून भारताने 132 कोटींचा विक्रमी टप्पा पार केला. तसेच सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावं, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

“जास्त हवेत उडायचं नसतं, मलिकांनी स्वतःची प्रतिमा भंगारात मिसळली”

भाजपने नितेश राणेंच्या खांद्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

ये रिश्ता क्या कहलाता है?; सोनाक्षी सिन्हाच्या पोस्टची सोशल मीडियावर तुफान चर्चा

कोविशील्ड लस घेतली का?, ‘त्या’ अहवालानं वाढवली भारतीयांची चिंता

“माझ्यावर दबाव आणण्यासाठी माझ्या भावाला…”, गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More