खऱ्या आयुष्यातील जोडी मोठ्या पडद्यावरही एकत्र, ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटातील खास फोटो समोर
मुंबई | अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट येत्या 27 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भव्य दिव्य अशा या ऐतिहासिक चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोघांच्याही काळात सरसेनापती होण्याचा मान मिळवणारे एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मुख्य भूमिका स्वत: प्रवीण तरडे साकारणार आहेत. तर हंबीररावांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते यांची भूमिका प्रवीण तरडेंच्या पत्नी स्नेहल तरडे साकारणार आहेत.
खऱ्या आयुष्यातील ही जोडी मोठ्या पडद्यावरदेखील एकत्र झळकणार आहे. या जोडीला एकत्र बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांचे सरसेनापती हंबीरराव चित्रपटातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
दरम्यान, प्रवीण तरडे यांच्या व्यतिरिक्त अनेक बडे कलाकार या चित्रपटाचा भाग आहेत. अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani) या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जबरदस्त अॅक्शन सिन्स आणि दमदार डायलॉग असणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! या अटी-शर्तींसह राज ठाकरेंची सभा होणार?
राज्यात कोरोनाचे नवे variant आढळल्यानंतर राजेश टोपेंनी दिली ‘ही’ अत्यंत महत्त्वाची माहिती
रशियाच्या इशाऱ्याला अमेरिकेकडून केराची टोपली, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत
“आज्जींना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ आहे, पण आमच्यासाठी नाही”
Comments are closed.