Top News खेळ

….म्हणून अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्स संघात घेतलं- माहेला जयवर्धने

Photo Courtesy- Twitter@mipaltan

मुंबई | 2021 च्या आयपीएलचा लिलाव 18 फेब्रुवारीला पार पडला. या लिलावात सर्वांच लक्ष लागलं होतं ते म्हणजे क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही यंदाच्या लिलावात सहभागा झाला होता. या लिलावात अर्जुनला सुरूवातीला कोणत्याच संघाने बोली लावली नाही. मात्र शेवटच्या राउंडमध्ये मुंबई इंडियन्स संघाने त्याला बेस प्राईजवर खरेदी केलं. मात्र सोशल माध्यमांवर अर्जुनला वशिल्यावर मुंबई संघात जागा मिळाली असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई संघाचे मुख्य प्रशिक्षक माहेल जयवर्धने याने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अर्जुनला आम्ही त्याच्याकडे असलेल्या पूर्णपणे कौशल्याच्या आणि गुणवत्तेच्या आधारे खरेदी केलं आहे. म्हणजे सचिनच्या कारणास्तव त्याच्या डोक्यावर एक मोठा टॅग असणार आहे. पण सुदैवाने तो गोलंदाज आणि फलंदाजही आहे, असं माहेला जयवर्धने म्हटलं आहे.  ESPNcricinfo दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता. 

आम्हाला अर्जुनला वेळ द्यावा लागेल आशा आहे की त्याच्यावरही जास्त दबाव आणला जाऊ नये. फक्त त्याचा खेळ सुधरू द्या आणि आम्ही त्याच्या मदतीसाठी आहोत, असंही जयवर्धने म्हणाले. अर्जुन मुंबईच्या संघात सामील झाल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांना आनंद झाला असला तरी काही लोकांनी नेपोटिझमचा उल्लेख करत निशाणा देखील साधला आहे. निवड झाल्यवर अर्जुनने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि संघ मालकांचे आभार मानतो. मी ब्लू गोल्ड जर्सीची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असल्याचं अर्जुन तेंडुलकर म्हणाला.

थोडक्यात बातम्या-

कुख्यात गुंड गजानन मारणेच्या ‘त्या’ जंगी मिरवणुकीवर अजित पवार म्हणाले…

कॉलेजला गेलेल्या तरुणीचा मृतदेह सापडला कालव्यात, घरातलाच आरोपी निघाल्याने खळबळ!

‘…पण इतिहास चुकीचा होता’; शिवजयंतीनिमित्त वीरूचं खास ट्विट

तबलिगी प्रकरणाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती?; तृप्ती देसाईंचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

सावधान! राज्यातील या दोन जिल्ह्यात सापडले कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या