नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरच्या अमरनाथ येथे ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरनाथमध्ये पवित्र गुहेजवळ संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे.
सायंकाळी साडे पाच वाजता ढगफुटी झाल्याची बातमी आहे. ज्यावेळी ढगफुटीचं वृत्त समोर आलं, त्यावेळी गुहेजवळ 10 ते 15 हजार भाविक उपस्थित होते.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आतापर्यंत 5 ते 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र जम्मू-काश्मीर पोलिसांनी दोन लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. या घटनेनंतर अनेक यात्रेकरून अडकले असून एनडीआरएफ तसेच एनडीआरपी टीमच्या जवानांकडून बचावकार्य केलं जात आहे.
दरम्यान, ढगफुटी झालेल्या भागामध्ये अनेक भाविक अडकले असून बचावकार्य सुरु आहे. या यात्रेला 30 जूनपासून सुरुवात झाली आहे. पवित्र अमरनाथ गुहेपासून दोन किलोमीटरवर ही ढगफुटी झाली आहे.
थोडक्यात बातम्या-
‘खाली काही घातलं की नाही?’; ‘त्या’ व्हिडीओमुळे मलायका अरोरा सोशल मीडियावर ट्रोल
‘मी व्हॅनिटी व्हॅनमध्येही सेक्स केलाय, रिस्क असते पण…’; रणवीरने सांगितला तो किस्सा
अभिनेता सुमीत राघवनने महाराष्ट्र सरकारला केली विनंती, म्हणाला…
राज्यातील ‘या’ भागांना रेड अलर्ट जारी, पुढील 24 तास पाऊस झोडपून काढणार
आलियाने सासू नीतू कपूर यांना दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाली…
Comments are closed.