मोठी बातमी! किरीट सोमय्यांना न्यायालयाचा दणका

मुंबई | महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये विविध प्रकरणांवरून जोरदार वाद रंगला आहे. अशातच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. आयएनएस विक्रांत प्रकरणात न्यायालयात सुनावणी पार पडली आहे.
आयएनएस प्रकरणात किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. परिणामी हे प्रकरण समोर आल्यापासून अज्ञातवासात असलेल्या सोमय्यांच्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत. आयएनएस विक्रांत प्रकरण हे कोट्यावधींच्या घोटाळ्यामुळं चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. तर विक्रांतसाठी जमा केलेला पैसा सरकारकडे जमा न करता पक्षकार्यासाठी वापरल्याचा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर सोमय्या अडचणीत आले आहेत.
दरम्यान, राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर लगेच राऊतांनी सोमय्यांच्या आयएनएस विक्रांत प्रकरणातील भ्रष्टाचाराला वाचा फोडली होती.
थोडक्यात बातम्या –
अनुष्का शर्माला आवडली हिरव्या वाटाण्याची भाजी अन् आळूची वडी; फोटो शेअर करत म्हणाली…
“शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यास ठाकरे सरकार जबाबदार”
ईडीच्या कारवाईने दिल्लीत गोंधळ; काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याची चौकशी सुरू
राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
देशातील कोरोना रूग्णांबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
Comments are closed.