बायकोशी पटत नाही म्हणून सख्ख्या आईला स्मशानात ठेवलं!

बायकोशी पटत नाही म्हणून सख्ख्या आईला स्मशानात ठेवलं!

अहमदनगर | आईचं बायकोशी पटत नाही म्हणून सख्ख्या आईला स्मशानात नेऊन ठवल्याचा धक्कादायक प्रकार नगरमध्ये घडलाय. लक्ष्मीबाई आहुजा असं या माऊलीचं नाव आहे. 

अहमदनगरच्या अमरधाम स्मशानभूमीत लक्ष्मीबाई दिवस ढकलत आहेत. मुलगा वाईट नाहीय, पण सुनेशी पटत नाहीय, त्याचा नाईलाज होतो म्हणून त्यानं इथं ठेवलंय, असं म्हणत आजही त्या त्यांच्या मुलाचं समर्थन करत आहेत. 

‘माऊली’ या सामाजिक संस्थेने त्यांच्या निवाऱ्याची सोय केलीय. पण आपला मुलगा घरी कधी नेईल? याची डोळ्यात तेल घालून त्या वाट पाहात आहेत.

Google+ Linkedin