बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिस्टम नव्हे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व फेल झालं- सोनिया गांधी

नवी दिल्ली | देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केलीये. कोरोना संकट रोखताना सिस्टिम फेल झालेली नाही. तर मोदी सरकार फेल झालं आहे, असं सोनिया गांधी यांनी म्हणाल्या.

मोदी सरकारने लोकांना मदत करण्याऐवजी आपल्या संवैधानिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. या वर्षाच्या सुरुवातीलाच अहंकाराने भरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाची लढाई जिंकल्याचा दावा केला. त्यांच्या पक्षाने मोदींचं गुणगाण गायलं, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.

ही काही विरोधक विरुद्ध सत्ताधारी अशी लढाई नाही. ही कोरोनाच्या विरोधातील लढाई आहे. त्यामुळे कोरोना संकट रोखण्यासाठी तातडीची सर्वपक्षीय बैठक बोलवा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. तसेच मोदी निवडणुकीत मश्गूल राहिले. कोरोना संकटाबाबत दिलेल्या इशाऱ्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, असा आरोप सोनिया गांधींनी केला आहे.

मी थेटपणे सांगते. आपली यंत्रणा फेल झालेली नाही. तर मोदी सरकार फेल झाली आहे. मोदी सरकार कोरोनाची लढाई लढण्यास समर्थ नाही. म्हणूनच आपण या परिस्थितीचा सामना करत आहोत. मोदी सरकारला लोकांच्या बाबतीत काहीही संवेदना राहिलेली नाही. त्यामुळेच आज भारतीय असह्य झालेले आहेत, अशा शब्दांत सोनिया गांधींनी संताप व्यक्त केला.

थोडक्यात बातम्या- 

शरद पवार-सुप्रिया सुळे यांचा मुंबईत फेरफटका, पाहा शरद पवारांचा लाईव्ह व्हिडीओ

राष्ट्रवादीनं पुण्याचा शहराध्यक्ष बदलला, ‘या’ नेत्याला दिली संधी

डॅडी अरूण गवळी झाला आजोबा; गवळी-वाघमारे कुटुंबात नव्या पाहुणीचं आगमन

दिलासादायक! पुण्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट, जाणुन घ्या आजची आकडेवारी

‘कोरोना लस निर्यातीत भारताने दाखवलेली उदारता विसरणार नाही’; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी मानले आभार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More