Top News

सोनू सूदने दिलेला शब्द पाळला; पुण्याच्या ‘वॉरीयर आजी’चं ते स्वप्न लवकरच सत्यात उतरवणार

पुणे | अभिनेता सोनू सूदने काही दिवसांपूर्वी ट्विटर एक व्हिडिओ शेअर केला होता. आजीबाई पोटाची भररस्त्यात दोन हातांनी काठ्या फिरवून कसरत करताना दिसत होत्या. सोनू कुणी मला या आजीबाई व त्यांच्या संपर्काबद्दल माहिती देता का, असं म्हटलं होतं.

आजीबाईंना घेऊन मी महिलांसाठी, मुलींसाठी स्व-संरक्षणाचे ट्रेनिंग देणारे स्कुल सुरू करु इच्छित आहे. कुणी मला या आजीबाई व त्यांच्या संपर्काबद्दल माहिती देता का, असं सोनू म्हणाला होता.

रविवारी निर्मिती परिवारातील सदस्यांनी या आजींची भेट घेतली. शब्द दिल्याप्रमाणे त्यांचे क्लास सुरू करण्याचं स्वप्न निर्मिती फाऊंडेशन सत्यात उतरवत आहे. सोनू सूद यांची मोलाची मदत मिळाली असून लवकरच आजीचे हक्काचे व्यासपीठ त्यांना मिळणार आहे, अशी माहिती निर्मित्ती फाऊंडेशने दिली आहे.

दरम्यान, ढालपट्टा खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील आजीबाई सोशल मीडियावर स्टार झाल्या होत्या. शांताबाई पवार यांना मदत करण्याची इच्छा अभिनेता रितेश देशमुख, सोनू सूद यांनी व्यक्त केली होती.

महत्वाच्या बातम्या-

मठात 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटन

उत्तर प्रदेशात मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या; शेतात सापडला मृतदे

पुढील तीन दिवस ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

शाळा कधी सुरु होणार?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली मोठी माहिती

राज्यातील मंदिरे, धार्मिकस्थळे लोकांसाठी सुरु करा, कारण…- रोहित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या