Top News पुणे महाराष्ट्र

अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची पसंती ऑनलाईनलाच!

पुणे | पुणे विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी 2 लाख 20 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील 1 लाख 85 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देण्याची पसंती दाखवली आहे.

कमी काळात ही परीक्षा संपवण्यासाठी पुणे विद्यापीठाने बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉईस क्वेश्चन- एमसीक्यू) पद्धतीचा अवलंब करणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेचे पर्याय आहेत, पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा द्यावी यासाठी विद्यापीठामने प्रयत्न सुरु केले होते. त्यासाठी पुणे विद्यापीठाचे कुलुगुरु डॉ. नितिन करमळकर यांनी प्राचार्यांची बैठकही घेतली होती.

पुणे विद्यापीठाअंतर्गत 2 लाख 48 हजार विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. सोमवार सायंकाळपर्यंत 2 लाख 20 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षेचे माध्यम निवडण्यासाठी सोमवार 14 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत लिंक ओपन होती.

महत्वाच्या बातम्या-

व्यापाऱ्याला मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्या- शरद पवार

‘जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं’; जया बच्चन यांचा रवि किशन यांना अप्रत्यक्ष टोला

काळ कठीण आहे फोन बंद ठेवू नका, 3 वाजताही कुणी फोन केला तरी उचला- चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथं तसं काही होईल वाटत नाही- निलेश राणे

…नाहीतर माझी जवानी अशीच निघुन जाईल; कोरोनाग्रस्त ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या