बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शरद पवारांंना ‘तो’ अधिकार नाही कारण…’ ; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारवर निशाणा

चंद्रपुर | औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युतीसंदर्भात एक सुचक वक्तव्य केलं. त्यामुळे राज्यात चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यालवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबाद येथे बोलतांना ‘सर्व आजी माजी एकत्र आले तर भावी सहकारी होऊ शकतात’ असं वक्तव्य केलं होत. त्याठिकाणी मंचावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही व्यवस्थित असताना हे वक्तव्य करण्याची गरज नव्हती, असं शरद पवारांनी म्हटल्याची माहिती आहे.

शरद पवारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराज होण्याचा कोणताही अधिकार नाही. जनताच त्यांच्यावर नाराज आहे, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यांना जनतेने नापास केलं आहे परंतु दुसऱ्याच्या उत्तर पत्रिकेवरील नाव खोडुन शरद पवारांनी स्वत:चं नाव टाकलं, असंही मुनगंटीवारांनी म्हटलं आहे. त्यासोबतच जनतेने तुम्हाला नापास केलं असतानाही सत्ता आली असं सांगत आहात, असा घणाघात शरद पवारांवर मुनगंटीवारांनी केला.

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना शिवसेनेवर सुद्धा टीकास्त्र सोडलं आहे. भाजपने शिवसेनेसोबत युती तोडली हे जगातील आठव आश्चर्य ठरेल. शिवसेनेने भाजपसोबत बेईमानी केली आहे. जनता त्यांची लक्तर वेशीवर टांगेल, असंही मुनगंटीवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘…तर मी तुमचा ‘चड्ढा’ उतरवेल’; नवज्योत सिद्धूंवर केलेल्या ‘त्या’ टीकेमुळे राखीचा चढला पारा!

माही मार रहा है! सराव सामन्यातच धोनीने मारले अर्धाडझनभर षटकार, पाहा व्हिडीओ

देवेंद्र फडणवीस अन् जयंत पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास!

अमरिंदरसिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचा ‘कॅप्टन’ कोण?; ही 2 नाव आघाडीवर!

…आता तर कोथळा काढायची भाषा वापरली जाते- शरद पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More