पुणे महाराष्ट्र

ऊसाची गाळप क्षमता सहा हजार टन करू- दिलीप वळसे पाटील

पुणे | भीमाशंकर सहकारी साखर कारखाना इथेनाॅल निर्मितीसाठी डिस्टीलरची उभारणी करणार असून , त्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. दैनंदिन गाळप क्षमता साडेचार हजार टनांवरून सहा हजार टनांवर आणण्याच येणार आहे, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दाखवला आहे.

दत्तात्रय-पारगाव  ता.आंबेगाव येथील भीमाशंकर कारखान्याच्या विसाव्या गळीत हंगामाचा आरंभ बा‌ॅयलर अग्निप्रदीपन आणि गव्हानपूजनावेळी वळसे पाटील बोलत होते.

भीमाशंकर कारखान्याने गेल्या गळीत हंगामात  180 दिवसात आठ लाख 12 हजार 909 टन उसाचे गाळप करून 11.85 टक्के साखर उताऱ्याने 9 लाख 62 हजार 475 क्विंटल साखरेचं उत्पादन घेतल. यंदाची परिस्थिती वेगळ असल्यामुळे ऊसाच्या गाळपाचे साडे पाच लाख टन इतकं उद्दिष्ट ठेवलं आहे, असं वळसे पाटलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब  बेंडे . माजी आमदार सूर्यकामत पलांडे, कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, प्रदाप वळसे, शिरूरचे माजी सभापती उषा कानडे अन्य मान्यावर उपस्थित होते.

महत्त्वाच्य बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या