अहमदनगर | मागच्या काही काळात कर्नाटकमध्ये सत्तांतर झालं. आता ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजपात येण्याने मध्य प्रदेशमध्ये सत्ताबदल होईल आणि महाराष्ट्रात पण लवकरच सत्तांतर होईल, असा दावा भाजप खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देताना सुजय विखे यांनी महाराष्ट्रात नक्की सत्तांतर होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसंच अपवादात्मक परिस्थितीत आलेली सत्ता आणि त्याच्यावर होणाऱ्या भाषणावर मी टीका करायला नको, असंही ते म्हणाले.
दुसरीकडे सूर्य जिकडे उगवतो तिकडे विखे जातात या अजित पवारांच्या टीकेला सुजय विखेंनी यावेळी उत्तर दिलं. आमचा सूर्य योग्यच ठिकाणी उगवला आहे. भाजपची केंद्रात सत्ता येणार आणि पुन्हा बहुमताने भाजप सरकार स्थापन करणार किंवा महाराष्ट्रातली भाजपची सत्ता जाणार, हे आम्हाला माहिती नव्हतं तरी आम्ही भाजपात प्रवेश केला. त्यामुळे आमचा सूर्य योग्यच ठिकाणी उगवला आहे, असं ते म्हणाले.
आम्ही कुणाकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केला नाही. आमच्यावर अन्याय झाल्याने आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला नाही. आम्ही जर भाजपमध्ये जाऊ नये असं त्यांना वाटत होतं तर त्यांनी आम्हाला लोकसभेला संधी का दिली नाही, असा सवालही त्यांनी विचारला.
ट्रेंडींग न्युज-
सावधान… पुण्यानंतर आता मुंबईमध्येही सापडले कोरोनाचे 2 रूग्ण
#Corona | कोरोना व्हायरसचा पहिला बळी
महत्त्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रात कोरोनाचे 10 रूग्ण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
राज ठाकरेंच्या ‘शॅडो कॅबीनेट’वर शरद पवारांचा पुणेरी टोमणा!
“कारस्थानी काँग्रेसवाल्यांनी एका चांगल्या नेत्याची कोंडी केली; राहुल गांधींचं हे मोठं अपयश”
Comments are closed.