देश

दिल्लीत वकिलांचा बंद; तर पोलीस आंदोलन करत रस्त्यावर…

नवी दिल्ली | राज्याची राजधानी असलेल्या नवी दिल्लीमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. इथं वकिल आणि पोलिसांमधील संघर्ष चांगलाच वाढला असून वकिलांनी संप पुकारला आहे तर पोलिस आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत.

दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात शनिवारी एका वकिलाला पोलिसांनी लॉकअपमध्ये जाण्यापासून रोखलं होतं. त्यानंतर वकिल आणि पोलिस एकमेकांना भिडले होते. यावेळी पोलिसांकडून गोळीीबार देखील करण्यात आला होता. त्यानंतर संतप्त झालेल्या वकिलांनी वाहनांची जाळपोोळ केली होती.

पोलीस आणि वकिलांच्या संघर्षाचं प्रकरण आणखीनच वाढलं आहे.  वकिलांनी पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे तर आपण या शहरात सुरक्षित नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

पोलिसांनी हातात काळ्या फिती बांधल्या असून आंदोलन सुरु केलंय. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत अशा प्रकारची परिस्थिती असल्याचं काँग्रेसनं भाजपला लक्ष्य केलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या