पुणे | आज शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत. सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष संजय राऊतांच्या या पत्रकार परिषदेकडे लागलं आहे. अशातच आज पुण्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे किरीट सोमय्यांविषयी वक्तव्य केल्याचं पहायला मिळालं. किरीट सोमय्यांचे आरोप हे TV वर येणाऱ्या जाहिरातींसारखे आहेत, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सोमय्यांवर निशाणा साधल्याचं पहायला मिळालं.
पुण्यात भाजप नेते किरीट सोमय्यांवर धक्काबुक्की झाल्यापासून राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसैनिक आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये जोरदार झटापट झाल्यानं किरीट सोमय्या जखमी झाले होते.
दरम्यान, संजय राऊत आज पत्रकार परिषदेत काय काय गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे आज पत्रकार परिषदेत काय खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
“दादा आपण आत्ताच आपली पब्लिसिटी करु कारण 3 नंतर संजय राऊत सगळे चॅनल टेक ओव्हर करतील”
पत्रकार परिषदेआधी संजय राऊतांचा माध्यमांशी संवाद, म्हणाले…
“आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश, उद्या शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र बोलणार”
बीडमध्ये धनंजय मुंडेंना धक्का, तर पंकजा मुंडे ठरल्या ‘किंग’
“मुलांच्या मनात एकमेकांच्या द्वेषाच विष पसरवू नये, भेदाभेद करणारे…”
Comments are closed.