Top News

अजूनही मोदीबाबाची थोडी थोडी हवा आहे- सुशीलकुमार शिंदे

Loading...

सोलापूर | अजूनही मोदीबाबाची थोडी थोडी हवा आहे. माझ्यासारख्या माणसावर देखील जादू केली होती, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे.

सुशीलकुमार शिंदेच्या उपस्थितीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा  आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुशीलकुमार शिंदे बोलत होते.

Loading...

मी सुद्धा सुरुवातीची दोन वर्षे म्हणत होतो की मोदी चांगलं काम करतायत. पण देशाची आर्थिक स्थिती बिघडायला लागली, तरुणांना नोकरी देण्याबाबत दिशाभूल व्हायला लागली, जाती- जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं म्हणत शिंदेंनी मोदींवर निशाणा साधला.

दरम्यान, शिवसेनेसारख्या पक्षाला आम्ही किमान समान कार्यक्रमात समाविष्ठ करुन महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष अर्थात सेक्युलर सरकार आणलं. ही सुरुवात आहे. म्हणून आता जास्त जबाबदारी वाढली आहे, असंही सुशीलकुमार शिंदे यावेळी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाच्या ‘संघ’ परिवाराचे योगदान काय?- शिवसेना

“वारिस पठाणांच्या वक्तव्यामुळे दिल्ली पेटली”

महत्वाच्या बातम्या- 

‘सोशल मीडिया’त मराठीच्या वापरात हजार टक्क्यांनी वाढ

“अटकेपासून वाचण्यासाठी बाळासाहेबांनी आणीबाणीत इंदिरा गांधींशी मांडवल्ली केली होती”

बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांची माहिती देणाऱ्यास मनसे देणार बक्षिस!

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या