बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फडणवीसांच्या मोदी-शहा भेटीनंतर सिंह यांनी पत्र दिलं म्हणूनच संशय येतोय”

मुंबई | शनिवारी संध्याकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून टाकणरी घटना घडली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. यावरून राजकीय वातावरण तापलं असून अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. मात्र अशातच ठाकरे सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातील आरोप फेटाळत शंका उपस्थित केली आहे.

हे भाजपचं षडयंत्र आहे. आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना भेटले आणि मग परमबीर सिंह यांनी हे पत्र लिहिलं आहे. त्यामुळेच संशय बळावला असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

परमबीर सिंह यांनी केलेले आरोप खोटे आहेत. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. अन्वय नाईक आणि टीआरपी घोटाळा प्रकरणात भाजप त्यांच्यावर नाराज होता. त्यानंतर आता सचिन वाझे प्रकरणातून सिंग यांना वाचवण्यासाठीच हे कारस्थान सुरु असल्याचं मुश्रीफ म्हणाले. तर देवेंद्र फडणवीस आधी दिल्लीत जाऊन बसले होते. तेथे त्यांनी  मोदी-शहा यांची भेट घेतली. त्यानंतर सिंह यांनी पत्र दिलं माझा संशय बळावला असल्याचंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.  तर अनिल देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेलं हे षडयंत्र आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-  

“फडणवीस मोदी-शाह यांना भेटले, नंतर सिंग यांनी पत्र दिलं म्हणूनच संशय येतोय”

‘…तर आदरणीय पवारजींना जाब विचारायला हवा’; काँग्रेस नेत्याचा शरद पवारांवर निशाणा

सरकारमधील प्रत्येकानं आपले पाय जमिनीवर आहेत का पाहावं- संजय राऊत

‘…म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पण 100 कोटीमध्ये हिस्सा होता’; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

गृहमंत्री अनिल देशमुखांसह साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा- तृप्ती देसाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More