बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; पंढरपुरात महावितरणला साप भेट

पंढरपूर | महावितरणने शेतीसाठी दिवसा वीज द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी कोल्हापूरात महावितरण कार्यालयासमोर गेल्या आठवडाभरापासून धरणे आंदोलन करत आहेत. अशातच आज पंढरपूर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी वेगळ्या प्रकारे आंदोलन केल्याचं पहायला मिळालं.

रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देत असताना शेतकरी सचिन ताठे यांना साप आढळला होता. तोच साप घेऊन सचिन ताठे आंदोलनास आले आणि तो साप कार्यकारी अभियंता यांना भेट म्हणून दिला. पंढरपूर येथे आज महावितरण विरोधात स्वाभिमानीकडून धरणे आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी ताठे यांनी अभियंता गवळी यांना साप भेट म्हणून दिला.

‘हा साप म्हणजे महावितरणकडून शेतकऱ्यांना मिळालेली देण आहे. महावितरणने आजवर शेतकऱ्यांसोबत कायमच दुजाभाव केला. रात्री अपरात्री कायम शेतकऱ्यांना वन्यप्राणी व हिंस्रप्राणी यांचा त्रास होतो ही महावितरणला जाणीव व्हावी म्हणून आम्ही प्रतिकात्मक पध्दतीने हा साप महावितरणला भेट दिला, असं स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास प्रखर आंदोलन करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानीचे सोलापुर जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हासंघटक शाहजहान शेख, तालुकाध्यक्ष साहेबराव नागणे, नानासाहेब चव्हाण, बाहुबली सावळे, मनोज गावंधरे, नवनाथ मोहिते, सुशिल शिंदे, पदाधिकाऱ्यांसह आणि शेतकरी उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

“ह्रदयाचे ठोके वाढले आहेत, आशा आहे की..”; अमिताभ बच्चन यांचं ट्विट चर्चेत

राष्ट्रवादीला मोठा धक्का! ‘या’ नेत्याची 13 कोटी 41 लाखांची मालमत्ता जप्त

मोठी बातमी! तीन दिवसांनंतर छत्रपती संभाजीराजेंचं उपोषण मागे

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार की आणखी चिघळणार?, दोन्ही देशात चर्चेला सुरुवात

संभाजीराजेंना पाठींबा देण्यासाठी 12 वर्षीय मुलाने अडवला राऊतांचा ताफा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More