बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना रोखण्यासाठी ठाकरे सरकारने घेतेलले 11 मोठे निर्णय; पाहा एका क्लिकवर

मुंबई | कोरोना प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र दररोज राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच प्राश्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठक घेऊन 11 निर्णय घेतले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या एकूण 39 पर्यंत गेली आहे. सर्वाधिक रूग्ण हे पिंपरी-चिंचवड आणि त्यापाठोपाठ पुण्यात असल्याची माहिती समजत आहे. तर देशात 110 जण कोरोनाबाधित आहेत. राज्य सरकारतर्फे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत.

ठाकरे सरकारने घेतेलले 11 मोठे निर्णय:-

– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या.
– ग्रामीण भागातीलही शाळा बंद ठेवणार.
– कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 15 आणि 10 कोटी तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक 5 कोटी रुपये असे 45 कोटींचा पहिला हप्ता देणार.
– क्वॉरंटाईन सुविधा असलेल्या ठिकाणी दूरचित्रवाणी, कॅरमबोर्ड, जेवण आदी सुविधा द्या. – ज्यांना 100 टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना आहे त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा जेणेकरुन समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटेल.
– केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहे त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आला.

– आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार.
– उद्यापासून मंत्रालयात अभ्यांगतांना प्रवेश न देण्याचा निर्णय.
– नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत. त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसात कार्यवाही करावी.
– होम क्वॉरंटाईन असलेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.
– धर्मगुरु, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन व्यापक जनहितासाठी कायद्याचा प्रभावी वापर करावा.

ट्रेंडिंग बातम्या-

तुला मला का भेटायचं होतं?; राज ठाकरेंच्या प्रश्नावर चिमुकलीचं गोंडस उत्तर, पाहा व्हिडीओ

“आम्ही उपाशी आहेत की नाही हे जनता ठरवेल मात्र तुम्ही नेहमी कुपोषित दिसता”

महत्वाच्या बातम्या-

“चंद्रकांतदादा जरा जपून बोला नाहीतर तुम्हाला तुमची उंची दाखवावी लागेल”

कोरोनामुळं कोणती पर्यटन आणि धार्मिक स्थळ बंद असतील; जाणून घ्या एका क्लिकवर

कोरोनामुळं निवडणूका पुढे ढकलाव्यात; राज्यसरकारची निवडणूक आयोगाला मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More