बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् भाजप उमेदवाराला पडलं फक्त ‘1 मत’; खुद्द परिवाराने फिरवली पाठ

नवी दिल्ली | निवडणूक लढवायची सर्वांची इच्छा असते. आपापल्या मत पडण्याच्या ताकदीवर निवडणूक लढवली जाते. देशातील सर्वाधिक राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपच्या सदस्य संख्येत सुद्धा 2014 नंतर झपाट्यानं वाढ झाली आहे. परिणामी भाजप उमेदवाराला निवडणुकीत जास्त मतांची अपेक्षा असते. पण तामिळनाडू मध्ये भाजप उमेदवाराला चक्क एक मत पडलं आहे.

तामिळनाडूमध्ये नुकत्याच स्थानिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपचे डी कार्तिक कोईम्बतूर जिल्ह्यातील एका वार्डातील सदस्य पदाची निवडणूक लढवत होते. कार्तिक यांना या निवडणुकीत केवळ 1 मत पडलं आहे. कार्तिक यांच्या घरात 5 सदस्य आहेत तरी त्यांना 1 मत पडल्यानं सर्वत्र कार्तिक यांची खिल्ली उडवली जात आहे.

कार्तिक यांनी आपल्या निवडणुकीत प्रचार करताना पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो लावला होता. कार्तिक यांच्या पराभवानं तामिळनाडूमध्ये भाजपची नाच्चकी झाली आहे. #सिंगलवोटबीजेपी हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. तामिळनाडूपासून दिल्लीपर्यंत भाजपच्या या नेत्याची ख्याती पोहचली आहे.

दरम्यान, तामिळनाडूमधील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला दारूण पराभव सहन करावा लागला आहे. कार्तिक यांच्या पराभवाची सर्वत्र चर्चा होत आहे.

थोडक्यात बातम्या 

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

तरुणांना तिशीतच का येतोय हार्टअटॅक?, महत्त्वाची कारणं आली समोर

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More