देश

“गाय एक जनावर आहे तिला माता म्हणणाऱ्यांच्या डोक्यात शेण भरलंय!”

डेहराडून | गाय एक प्राणी आहे आणि तिला माता म्हणणाऱ्यांच्या डोक्यात शेण भरलंय, असं खळबळजनक वक्तव्य माजी सर न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केलं आहे. डेहराडून येथिल एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

राम देव नसून एक साधारण व्यक्ती होता. गाय ही घोडा आणि कुत्र्यासारखं एक जनावरच आहे. तिला देव माता म्हणणाऱ्या लोकांच्या डोक्यात शेण भरलंय, असं काटजू म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्ष गोमातेचा मुद्दा चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांची मतं वळवण्यासाठी हे सुरु असल्याचं कटजू यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, लोकं भूकेने तडफडून मरत आहेत आणि आपण इकडे राम मंदिराचा मुद्दा घेऊन बसलोय, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“शिवसेनेला अण्णांची इतकीच काळजी असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं”

-महाघोटाळा दडपला; ‘डीएचएफएल’ने फाडली भाजपची 20 कोटींची पावती!

खासदार संजयकाका पाटलांनी आमदार सुरेश खाडेंना भर सभेत झापलं

-अण्णांच्या भेटीसाठी राज ठाकरे राळेगणसिद्धीकडे रवाना

…तर मी माझा ‘पद्मभूषण’ पुरस्कार परत करणार- अण्णा हजारे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या