बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला मुलगी न्यायालयात आव्हान देऊ शकते- मुंबई उच्च न्यायालय

मुंबई । वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला मुलगी न्यायालयात आव्हान देऊ शकते, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. लग्न झालेल्या पती आणि पत्नीलाच दुसऱ्या विवाह परवानगीला आव्हान देण्याचा अधिकार असतो, असा एका महिलेने न्यायालयात अर्ज केला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्वाळानंतर मुंबईतील कुटुंब न्यायालयाने त्या महिलेचा अर्ज फेटाळून लावला आहे.

पती आणि पत्नीलाच विवाह परवानगीला आव्हान देण्याचा अधिकार असतो. हा निर्णय चुकीचा असल्याचं सांगत वडिलांच्या दुसऱ्या विवाहाच्या परवानगीला मुलगी न्यायालयात आव्हान देऊ शकते, असं मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आर. डी. धनुका आणि न्यायाधीश बिश्ट यांच्या खंडपीठाने सांगितलं आहे.

मुंबईतील तक्रारदार महिला याचिकेत म्हणाली आहे की, माझ्या आईच्या मृत्यूनंतर माझ्या वडिलांनी 2003 साली दुसरं लग्न केलं. 2016 मध्ये वडिलांचं निधन झाल्यावर माझ्या सावत्र आईला वडिलांच्या पहिल्या लग्नाविषयी कळालं. पण तीचाही पूर्वी एका पुरुषाशी विवाह झाला होता. तसंच पहिल्या नवऱ्यासोबतची घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्याआधीच तिने दुसर लग्न केल होतं. या सगळ्या परिस्थितीमुळे मी वडिलांच्या विवाह वैधतेला कुटुंब न्यायालयात आव्हान दिलं आहे.

दरम्यान, विवाहाच्या वैधतेला आव्हान देण्याचा अधिकार फक्त नवरा बायकोलाच असतो. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला नसतो, असा युक्तीवाद तक्रारदार महिलेच्या सावत्र आईने मांडला. मात्र तक्रारदार महिलेने घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्याआधीच सावत्र आईने दुसरा विवाह केला होता. हीच गोष्ट मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कुटुंब न्यायालयाचा निष्कर्ष चुकीचा असल्याचं सांगत कुटुंब न्यायालयाने पुन्हा एकदा सुनावणी घेऊन कायद्यानुसार योग्य तो निर्णय द्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

थोडक्यात बातम्या

अब्रू वाचवण्यासाठी माजी मंत्र्यांनी पळपुटेपणा केला- धनंजय मुंडे

मलायका अरोराचा हॉट अंदाज; शेअर केला जीममध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ, पाहा व्हिडीओ

“नागपुरात जन्म घेतलेली संघटना…”; राहुल गांधींची संघावर बोचरी टीका

“इतरांना तुच्छ लेखण्याचा महाजनांचा स्वभावच जळगावात भाजपला घेऊन बुडाला”

‘मेधा कुलकर्णी आपण एका जीवाचा बळी घेतलाय’; रूपाली चाकणकरांचा मेधा कुलकर्णींवर गंभीर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More