बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

मुंबई | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं देशभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना आणि कोरोनाचे व्हेरियंट यांनी तर कहर केला असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केलं आहे. अशातच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती सांगितली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू येऊन गेला आहे असं म्हणता येईल. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणी अचानक बाधितांची संख्या वाढत होती. ती आता तशी नाही. रुग्णसंख्येचा आकडा कमी होत चालल्याचं पहायला मिळत आहे.

राज्यात कोरोना रुग्णांसाठी करण्यात आलेले 92 ते 95 बेड अद्याप रिकामे आहेत. त्यापैकी फक्त 5 ते 7 टक्के बेडवर रुग्ण आहेत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

दरम्यान, राजेश टोपे यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटविषयीही सांगितल. ते म्हणाले की, मी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटविषयी ऐकलं आहे. तो मोठ्या प्रमाणावर घातक असल्याचं मी ऐकलं आहे. याविषयी अजून संशोशन सुरु आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोबाईल वापरकर्त्यांसाठी खूशखबर! आता 28 नाही तर ‘एवढ्या’ दिवसांचा असणार रिचार्ज प्लॅन

आता ऑनलाईन परिक्षेतही विद्यार्थ्यांवर राहणार वाॅच, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा मोठा निर्णय

Petrol Diesel Price: जाणून घ्या आजचे ताजे दर

कोरोनाच्या ‘या’ नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवली, WHO म्हणाले…

‘या’ तारखेपासून पुण्यातील शाळा सुरु होणार, अजित पवारांनी केली मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More