बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! पोराने आईच्या कष्टाचं केलं चीज, 50 व्या वाढदिवसाला दिलं खास गिफ्ट

ठाणे | आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आई-वडिल काबाड कष्ट करतात. मुलंही मोठी झाल्यावर आपल्या आई-बापाने केलेल्या कष्टाचं चीज करतात. अशाच प्रकारे सोलापूर जिल्ह्यातील एका माऊलीने आयुष्यभर कष्टाने केलेल्या कामामुळे चांगले दिवस आले आहेत. या माऊलीला तिच्या मुलाने 50व्या वाढदिवशी खास गिफ्ट दिलं आहे.

सोलापुर जिल्हाच्या बार्शी तालुक्यातील रेखा दिलीप गरड यांच्या पतीवर काळाने घाला घातला. त्यानंतर एकट्या पडलेल्या रेखा गरड यांनी हार न मानता आपल्या तीन लहान लेकरांसोबत ठाण्यात आल्या. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी धुणंभांडी केली. एक दिवस त्या आपल्या मोठ्या मुलासोबत घराच्या टेरेसवर बसल्या असताना वरून एक हेलीकॉप्टर गेलं त्यावेळी त्या बोलताना म्हणाल्या की आपल्याला कधी यात बसायला मिळेल?,

प्रदीपने आपल्या आईची ती गोष्ट लक्षात ठेवली आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण घेत नोकरी मिळवली. नोकरी मिळाल्यावर त्याने फ्लॅट खरेदी केला आणि आपलं कुटुंबाचं चाळीतून फ्लॅटमध्ये स्थलांतर केलं. प्रदीपने आपल्या आईच्या वाढदिवसादिवशी सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी म्हणून घेऊन जुहूच्या एअरबेसला गेला. तिथे गेल्यावर आईसह संपुर्ण कुटूंबाने हेलीकॉप्टर राईडचा आनंद घेतला. त्यावेळी प्रदीपच्या आईचे डोळे पाण्याने भरून आले होते.

दरम्यान, ज्या आईने मला इथपर्यंत पोहचवण्यास कष्ट घेतले त्या आईची इच्छा पूर्ण करता आली हे मी माझं भाग्य समजतो, असं प्रदीप म्हणाला. प्रदीपची आई म्हणाली की, आईने मुलांना बोट धरुन लहानाचं मोठं केलं त्या आईचं स्वप्न करणारा मुलगा सर्वांना मिळो.

 थोडक्यात बातम्या – 

“तुमचं जेवढं वय झालंय ना तेवढी पवारांची संसदीय कारकीर्द आहे”

“बैलगाडा शर्यतीसाठी शेतकरी येणार, अफगाणिस्तानवरुन तालिबानी नाहीत”

अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी वाट्टेल ते; विमानाच्या आतले फोटो धक्कादायक

‘त्यांनी टीका केली म्हणून मी…’; शरद पवारांच्या टीकेवर राज्यपालांची प्रतिक्रिया

विधान परिषदेतील 12 आमदारांची नियुक्ती का रखडली?, मोठं कारण आलं समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More