बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत आता हळूहळू घट होत असल्याचं दिसून येत आहे. आज राज्यात 42582 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 54535  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 4654731 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात आज 850 कोरोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 % एवढा आहे.राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 30351356 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5269292 नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 3502630 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 28847 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 533294 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने 15 मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. यानंतर आता हे निर्बंध येत्या 1 जूनपर्यंत लागू राहणार आहेत. याबाबतचे परिपत्रक शासनाने जाहीर केलं आहे. यानुसार महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं आवश्यक आहे.

थोडक्यात बातम्या- 

गडकरींची कमाल! वर्ध्यातून रेमडेसिव्हीरचा पहिला स्टॉक बाहेर

लग्नाची खरेदी करताना मायलेकींना कोरोनाची लागण; आईच्या अंत्यसंस्कारावेळीच लेकीनेही सोडले प्राण

महत्त्वाची बातमी! लसीच्या दोन डोसमध्ये असावं इतक्या दिवसांचं अंतर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

कोरोनाचा ‘शक्तिमान’लाही फटका! आयसीयू बेड न मिळाल्याने मुकेश खन्नांच्या घरातील व्यक्तिचं कोरोनाने निधन

कोरोनाची नवी लक्षणं आली समोर; ‘ही’ लक्षणं दिसली तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More