Top News महाराष्ट्र मुंबई

राज्यातील जनता सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी- जयंत पाटील

मुंबई | बेळगावसह महाराष्ट्राच्या सीमाभागात आज काळा दिवस पाळण्यात येतो. कर्नाटकात मराठी बांधवांवर होणारा अन्याय, अत्याचाराचा निषेध म्हणून मुंबईत राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून कर्नाटक सरकारचा निषेध केला आहे.

आमचा मराठी माणसाचा सीमा भाग लवकरच महाराष्ट्रात सामील होईल. राज्यातील जनता सीमा भागातील मराठी भाषिक लोकांच्या मागे पूर्ण ताकदीने उभी आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात प्रकरण विलंबित असलं तरी कर्नाटकमधील मराठी बांधवांवरील अन्याय थांबलेला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस याचा निषेध करत असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलंय.

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे आजही काळा दिन रॅलीला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. त्याचबरोबर काळे कपडे घालण्यावरही मनाई करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवारांना धडा शिकवा, त्यांची सरकारमधून हकालपट्टी करा”

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अनिल देशमुख, नवनीत राणांसह 17 जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

उद्यापासून अकारावीचे ऑनलाइन वर्ग सुरू होणार!

काँग्रेस आमदाराला 50 कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर आरोप

“मुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय पार्थ पवारांचाही सल्ला घ्यावा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या