बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात साथीच्या रोगांचा कहर! ‘या’ जिल्ह्यात आढळले तब्बल 1300 रूग्ण

नाशिक | गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडील राज्यात डेंग्यूने थैमान घातलं आहे. पावसामुळं सर्वत्र वातावरण बदलताना दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणून देशभरात डेंग्यू आणि व्हायरल फिवरचे रूग्ण सर्वत्र वाढताना दिसत आहे. त्यातच आता नाशिकमध्ये देखील डेंग्यूचे रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसतंय.

नाशिक शहरात डेंग्यू आणि चिकनगुनिया थैमान घातलं आहे. नाशिकमध्ये 700 डेंग्यूचे रूग्ण आणि चिकनगुनियाचे 550 रूग्ण आढळले आहेत. एकीकडे कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्यानं  डेंग्यू आणि चिकनगुनियामुळे नाशिककरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सरकारी आणि खासगी रूग्णालयात ताप, सर्दी, खोकला आणि अंगदुखीचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे आता काही ठिकाणी रूग्णांना बेड देखील मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे. महापालिकेने शहरात यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा या राज्यात डेंग्यूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आतापर्यंत तब्बल 12 हजार रूग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तर आता महाराष्ट्रात देखील डेंग्यूचे रूग्ण वाढताना दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या-

गुजरातमध्ये संपुर्ण मंत्रिमंडळच बदललं, विजय रूपाणींच्या सगळ्याच मंत्र्यांना नारळ 

मनसेचं ‘मिशन नाशिक’! राज ठाकरे तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर

विराट कोहलीने ‘या’ 4 जणांशी चर्चा करत घेतला कर्णधारपद सोडण्याचा निर्णय!

…अन् नो बाॅलवर माझी विकेट पडली – संजय राठोड

मोठी बातमी! विराट कोहली सोडणार भारतीय संघाचं कर्णधारपद

…म्हणून गडकरींनी आपल्या सासऱ्यांच्याच घरावर चालवला बुलडोझर; कार्यक्रमात सांगितला ‘तो’ खास किस्सा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More