बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘धन्य ते यूपी सरकार, धन्य ते मोदीजी’; कोरोनाने मृत्यू झालेल्या भाजप आमदाराच्या मुलाने सरकारला सुनावलं

लखनऊ | भाजप आमदार केसर सिंह गंगवार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच त्यांना 24 तास ICU बेड मिळाला नसल्याची माहिती आहे. आता केसर सिंह गंगवार यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा विशालनं एक फेसबुक पोस्ट लिहून सरकारबद्दल रोष व्यक्त केला.

हेच का उत्तर प्रदेश सरकार? त्यांना आपल्याच आमदारावर उपचार करता येत नाहीत. मी कित्येकदा मुख्यमंत्री कार्यालयाला फोन केले. पण कोणाची टाप आहे फोन उचलण्याची. धन्य ते यूपी सरकार, धन्य ते मोदीजी!’ अशा शब्दांत विशाल यांनी सरकारबद्दल संताप व्यक्त केला. त्यांच्या या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

18 एप्रिलला गंगवार कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. सुरुवातीला त्यांना बरेलीच्या राममूर्ती मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण, त्यांना 24 तासांपर्यंत एक आयसीयू बेड मिळाला नाही.

काही दिवसांपूर्वीच त्यांना नोएडातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी  केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मला बेड उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो कशाला?’; माजी प्राध्यापकाने कोरोना लस घेण्यास दिला नकार

राजीव सातव यांच्या प्रकृतीसंदर्भात समोर आली महत्वाची माहिती!

मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे, ताई काळजी घ्या- धनंजय मुंडे

कोरोना रूग्णांसाठी ‘ऑक्सिजन पार्लर’ची भन्नाट कल्पना; वाचा काय आहे प्रकार

बाळासाहेब थोरात एक वर्षाचं तर काँग्रेस आमदार एक महिन्याचं वेतन सीएम रिलीफ फंडात देणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More