बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! तालिबान्यांनी फाडून टाकला पाकिस्तानचा झेंडा, व्हिडीओ व्हायरल

काबूल | जागतिक बॅंक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तालिबानचा कर्जपुरवठा थांबवला आहे. त्यामुळे सध्या अफगाणिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत आहे. अशातच आता अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानकडून वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. अफगाणिस्तानमध्ये मदत घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानच्या ट्रकवर पाकिस्तानचा झेंडा पाहुन तालिबान्यांना संताप आला आणि तो झेंडा त्यांनी फाडून टाकला. यासंदर्भात एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाकिस्तानकडून अफगाणिस्तानमध्ये आर्थिक मदत पुरवली जात आहे.  तरी पाकिस्तानच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे तालिबान काही दिवसांपासून नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. आपल्या सरकाराबाबत पाकिस्तानने कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करू नये, असं वक्तव्य तालिबानकडून वारंवार करण्यात आलं आहे. यामधून तालिबान्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना थेट इशाराच दिला आहे.

पाकिस्तानकडून मदत घेऊन जात असलेल्या ट्रकवर ‘पाक-अफगाणिस्तान को-ऑपरेशन’ फोरम लिहलं होतं. ही मदत दोन्ही देशांच्या सहमतीने सुरु आहे. पाकिस्तानने त्यांच्या देशाचा झेंडा ट्रकवर लावल्याने तालिबान्यांना ते सहन झालं नाही आणि तो झेंडा फाडून टाकला. त्यावेळी त्या ट्रक चालकाला धमकावल्याचं ही व्हिडीओमधून स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान,  अलिकडेच अफगाणिस्तानमध्ये बॉम्ब हल्ला झाला होता. त्यावेळी 8 लोकांचा मृत्यू झाला. याआधीही अफगाणिस्तानमध्ये अनेक हल्ले झाले आहेत, त्यामुळे सध्या अफगाणिस्तानमधील लोकांना मोठ्या प्रमाणात संकटांचा सामना करावा लागत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘खतरो के खिलाडी 11’ च्या विजेत्याचं नाव फुटलं?, ‘हा’ अभिनेता ठरला विजेता!

शरद पवारांनी नाही तर काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपासला- रामदास आठवले

मोठी बातमी! IPL पुन्हा थांबवणार??? ‘या’ संघातील महत्त्वाचा खेळाडू कोरोनाबाधित

“56 वाल्यांचा मुख्यमंत्री होऊ शकतो, तर 119 वाले राज्यसभेत का जाणार नाहीत?”

बाॅयफ्रेंड तुझा की माझा?, तरुणींचा मॉलमध्ये राडा, पाहा व्हिडीओ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More