बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दोघात तिसरा आता सगळं विसरा! महिलेला चुंबन देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या

नवी दिल्ली | अमेरिकेतील इलिनाॅयमध्ये एका घटनेनं सर्वांना सुन्न केलं आहे. महिलेला एका व्यक्तीने चुंबन देण्यास नकार दिल्याने तिने थेट त्याचा जीव घेतला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिलेचं नाव रेसेंडिझ-फ्लोरेस असं असून ती 28 वर्षांची आहे.

आरोपी महिलेनं गुरुवारी मद्यपान केलं होतं. यावेळी एक जोडपं आपला वेळ व्यथित करत असताना महिलेने तिथं जाऊन व्यक्तीला चुंबन देण्यास सांगितलं. संबंधित व्यक्तीने महिलेला नकार दिला आणि आपल्या प्रेयसीकडे गेला. त्याने महिलेसमोर त्याच्या प्रेयसीचं चुंबन घेतलं.

प्रेयसीला चुंबन दिल्यानंतरसुद्धा महिलेने पुन्हा एकदा किस्स करण्यास सांगितलं. मात्र व्यक्तीने पुन्हा एकदा नकार दिला. यानंतर संतापलेल्या महिलेने दोन कुशनच्या मध्ये बंदुक ठेऊन त्या व्यक्तीवर निशाणा साधला. काही वेळानंतर महिलेने त्याच्यावर गोळ्या झाडून त्याला संपवलं.

दरम्यान, संबंधित मृत झालेल्या व्यक्तीचं नाव जेम्स असं होतं. जेम्सच्या प्रेयसीने पोलिसांना फोन करुन बोलावून घेतलं. यावेळी आरोपी महिलेने आपला गुन्हा कबूल केला. यानंतर महिलेवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मी राजीनामा देतोय पण, माझं मन…’; बाबुल सुप्रियोंच्या सेकंड इनिंगची सुरूवात

‘…म्हणून मोदी चहामध्ये साखर देखील घेत नाहीत’; औवैसींचा घणाघात

दोन वर्षात शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना काय मिळालं? निलेश राणेंची शरद पवारांवर जळजळीत टिका

‘तुम्ही पेट्रोल मला द्या ना…’, पेट्रोलपंपावर गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

‘या’ वर्षीही भेटणार वाहतूक करात सवलत?; ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More