बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रेयसीला भेटायला जायचं आहे, कोणतं स्टीकर लावू?; तरूणाच्या अजब सवालावर मुबंई पोलिसांचं भन्नाट उत्तर

मुंबई | राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं कडक लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात मुंबईत प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवा आणि महत्वाच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्यांना गाडीला एक खास स्टिकर लावण्याचं आवाहन मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केलं आहे. मुंबई पोलिसांनी यासाठी खास 3 रंगाचे स्टिकर सांगितले आहेत. त्यावरुन एका पठ्ठ्यानं मुंबई पोलिसांना ट्विटरच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला आहे. त्या प्रश्नाला मुंबई पोलिसांनीही भन्नाट उत्तर दिलं आहे.

प्रेयसीची आठवण येत आहे. तिला भेटायला जाण्यासाठी कुठलं स्टिकर वापरु? असा प्रश्न एका तरुणाने मुंबई पोलिसांना ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे. त्यावर मुंबई पोलिसांनीही खास उत्तर दिलं आहे. तुमच्यासाठी भेट घेणं आवश्यक असलं तरी ते आमच्या अत्यावश्यक सेवेच्या यादीत येत नाही. हा दुरावा तुमच्यातील प्रेम वाढवेल, असं उत्तर मुंबई पोलिसांनीही ट्विटरच्या माध्यमातून दिलं आहे. तसच ही कोरोना स्थिती संपल्यानंतर तुम्ही आयुष्यभर सोबत असाल, अशा शुभेच्छाही मुंबई पोलिसांनी त्या तरुणाला दिल्या आहेत.

‘राज्य सरकारनं जारी केलेल्या नियमांनुसार आपण लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करत आहोत. महत्त्वाच्या चेक नाका, टोल नाक्यावर वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे डॉक्टर, नर्सेस, रुग्णवाहिका, रुग्णालये यांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे आपण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या गाड्यांसाठी कलर कोड सुरु करत आहोत’, अशी माहिती हेमंत नगराळे यांनी दिली आहे.

दरम्यान, वैद्यकीय कर्मचारी यांच्या गाड्यांसाठी लाल रंग, भाजीपाल्याच्या गाडीसाठी हिरवा रंग, इतर अत्यावश्यक सेवासाठी पिवळा रंग असणार आहे. अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांना 6 इंच गोल सर्कल लावण्याच्या सूचना पोलीस आयुक्त यांनी दिल्या आहेत. मुंबई पोलिसांकडून सीआरपीसी 144 अंतर्गत नव्या गाईडलाईन्स जारी केल्या जाणार आहेत.

 

 

 

थोडक्यात बातम्या

बुधवारी देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने जगातील सर्वोच्च उच्चांक गाठला

आठ दिवसानंतर वाईन शॉप उघडल्याने बीडमध्ये मद्यप्रेमींच्या लांबच लांब रांगा

राज्यातील 13 विद्यापीठांच्या परीक्षेबाबत उदय सामंत यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“नाशिकचा कायापालट करतो अन्यथा तोंड दाखवणार नाही”; फडणवीसांच्या ‘त्या’ भाषणावर काँग्रेसचं टीकास्त्र

…त्यानंतर औद्योगिक घटकांना ऑक्सिजनचा पुरवठा होणार सुरू- अर्थमंत्री निर्मला सीतारमण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More