बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लाईव्ह रिपोर्टिंग करताना चोरट्याने रोखली पत्रकारावर बंदूक, अन्…; पाहा व्हिडिओ

इक्वाडोर | इक्वाडोरमधील लाईव्ह शो करणाऱ्या एका पत्रकाराला बंदुकीचा धाक दाखवून चोरट्याने लूटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा सगळा प्रकार लाईव्ह शोमध्ये घडल्याने कार्यक्रम पाहणाऱ्या लोकांमध्ये आणि दर्शकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. परीसरातही भीतीचं वातावरण तयार झालं आहे.

स्काई न्यूजने दिलेल्या माहितीनूसार, गुआयाकिल शहरातील एस्टॅडिओ स्मारकाच्या बाहेरून इक्वाडोरचे क्रीडा पत्रकार डिएगो ऑर्डिनोला गेल्या आठवड्यात लाईव्ह शो करत होते. त्याचवेळी काही चोरट्यांची  एक टोळी त्या ठिकाणी पोहचली. त्यांनी लाईव्ह सुरू असतानाच बंदूक दाखवली आणि पैशांची मागणी केली.

दरोडेखोरांनी बंदूक दाखवताच डिएगो ऑर्डिनोला यांनी आरडोओरड केली. आसपासच्या लोकांना मदतीसाठी हाक मारल्यावर कोणीही समोर आलं नाही. बंदूक पाहताच लोकांनी जागेवरुन पळ काढला. डिएगो आणि कॅमेरामॅन दोघांनी घाबरून चोराला पैसे दिले.

यानंतर कॅमेरामॅनने त्याच्यामागे धाव घेत तो कुठून जात आहे हे देखील रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. पोलीस या घटनेचा आणि दरोडेखोरांचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पाहा व्हिडिओ-

 

 

 

थोडक्यात बातम्या-  

आज ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे भाव…

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बंधूंचा काँग्रेसला रामराम; ‘या’ पक्षात केला प्रवेश

मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याने मुंबईत हायअलर्ट

छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री पूजा चव्हाण प्रकरणावर गप्प का?- देवेंद्र फडणवीस

मोदी हे महान आहेतच त्याविषयी शंका घेण्याचं कारण नाही, पण…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More