बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 20 पैशांत धावेल एक किलोमीटरपर्यंत; जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली | पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वच चिंताग्रस्त आहेत. मात्र आयआयटी दिल्लीच्या इनक्युबेटेड स्टार्टअप गॅलिओस मोबिलिटीने एक ‘होप’ नावाचं इलेक्ट्रिक स्कूटर बनवलं आहे जे फक्त 20 पैशात एक किलोमीटरपर्यंत धावेल. ही स्कूटर ताशी 25 किमी टाॅप स्पीड देते.

विशेष म्हणजे या स्कूटरला ड्रायव्हिंग लायसन्स किंवा नोंदणीची आवश्यकता नाही. ही स्कूटर घरपोच सेवा आणि स्थानिक प्रवास करण्यासाठी परवडणारी आहे. याशिवाय ही स्कूटर इलेक्ट्रिक वाहनांना देण्यात येणाऱ्या सूटच्या प्रकारात येते. या स्कूटरची बॅटरी 4 तासात पूर्णपणे चार्ज केली जाते. ‘होप’ सोबत एक पोर्टेबल चार्जर आणि पोर्टेबल लिथियम-आयन बॅटरी दिली जाणार आहे, जी घरामध्ये वापरल्या जाणार्‍या सामान्य प्लगने चार्ज केली जाऊ शकते. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार दोन वेगवेगळ्या रेंजमध्ये 50 किमी आणि 75 किमी बॅटरी क्षमता निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

होपमध्ये अत्याधुनिक वापरासाठी तयार केलेली मजबूत आणि कमी वजनाची फ्रेम आहे. स्कूटरची रचना आणि तिच्या लीन डिझाईनमुळे ट्रॅफिकमधूनम ती सहजपणे बाहेर पडू शकते. स्कूटरमध्ये रिवॉल्युशनरी स्लाईड आणि राईडच्या आवश्यकतेनुसार वजनाची भारवाहक उपकरणे किंवा मागील सीट वाहनाला जोडली जाऊ शकते. याबाबत कंपनीने सांगितलं आहे की, सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मार्गांवर स्कूटर चार्जिंग आणि देखभालीसाठी हब तयार करण्यात येतील. याशिवाय कंपनी आपत्कालीन परिस्थितीत मदत आणि बॅटरी बदलणे यासारख्या आपत्कालीन सेवा देखील देऊ करणार आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 46,999 रुपये आहे.

दरम्यान, आयआयटी-दिल्लीनुसार ही स्कूटर बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम, डेटा मॉनिटरिंग सिस्टम आणि पेडल असिस्ट युनिट सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. त्यात आयओटी आहे जे डेटा विश्लेषकांद्वारे ग्राहकांना त्यांच्या स्कूटरबद्दल नेहमी माहिती देते. अशा वैशिष्ट्यांमुळे, होप भविष्यातील स्मार्ट आणि कनेक्ट केलेल्या स्कूटर्सच्या श्रेणीमध्ये येते. शिवाय स्कूटरमध्ये पेडल असिस्ट सिस्टमसारखे विशेष वैशिष्ट्य दिलं गेलं आहे. प्रवासादरम्यान ग्राहक त्यांच्या सोयीनुसार पेडल किंवा थ्रॉटलचा पर्याय निवडू शकतात.

थोडक्यात बातम्या

मन सुन्न करणारी घटना; सख्ख्या आईच्या संमतीने 15 वर्षांच्या मुलीवर 30 जणांनी केला बलात्कार

“पेशवाई आणण्यासाठी धुंद झालेले ‘बंटी बबली’ आता राजकारणात धुमाकूळ घालत आहेत”

शहीद जवानाला अवघ्या 1 वर्षाच्या लेकीने दिला मुखाग्नी; संपूर्ण देश हळहळला

‘पीछे हटो पीछे…’; दीप प्रज्वलन करताना फोटोसाठी पुढे आलेल्या बाबूल सुप्रियोंवर अमित शहा भडकले, पाहा व्हिडीओ

“महाराष्ट्र सरकारने 100 कोटींच्या वसुलीचा आधी हिशेब द्यावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More