बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून महेंद्रसिंग धोनीला केलंय विश्वचषकाच्या संघाचं मेन्टाॅर’; सौरव गांगुलीने सांगितलं कारण

मुंबई | भारतात क्रिकेट हा अनेकांचा जीव की प्राण आहे. आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी बुधवारी भारतीय संघ जाहीर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये नवख्या खेळाडूंना स्थान दिल्याचं पाहायला मिळत आहे. तर, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची मार्गदर्शक म्हणून निवड केली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केलेली विनंती महेंद्रसिंग धोनीने स्वीकारल्याबद्दल त्याचे मनपूर्वक आभार गांगुलीने मानले आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या अनुभवाचा भारतीय संघाला नक्कीच फायदा होईल, त्यामुळेच त्याची मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे.

महेंद्रसिंग धोनी भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. 2007 साली झालेल्या टी-20 विश्वचषक, 2011 चा विश्वचषक आणि 2013 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्राॅफीत भारताने कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्याच नेतृत्वातच विजय प्राप्त केला आहे.

दरम्यान, धोनीला मार्गदर्शक म्हणून निवडल्यानंतर वाद होताना दिसत आहे, यासंबंधीचे वृत्त माध्यमात आले आहेत. धोनी विरोधात परस्पर हितसंबंधाची तक्रार करण्यात आली आहे. एक व्यक्ती दोन पदांवर राहू शकत नाही, म्हणून याविषयी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी संजीव गुप्तांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे तक्रार केली आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ कायदेशीर सल्लामसलत करणार आहे.

 

थोडक्यात बातम्या –

“देशाचं चित्र बदलतंय, भारताची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने”

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

‘राणे कुटुंबाची नाही आता क्राईम ब्रांचच्या….’; लुकआऊट नोटीसवरून नितेश राणे संतापले

‘दीड वर्षाचं काम 15 दिवसात करणार’; नितीन गडकरींनी दिला शब्द

नाशिक पोलिसांचा मास्टर प्लॅन! हेल्मेट न घालणं जीवावर नाही तर कानावर बेतणार

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More