अभिनेत्री विशाखा सुभेदारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय, पोस्ट शेअर करत म्हणाली…
मुंबई | आपल्या दमदार कॉमेडी अंदाजाच्या जोरावर अभिनेत्री विशाखा सुभेदारनं सगळ्यांना पोटधरुन हसवलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. सध्या विशाखा एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे.
विशाखा सुभेदार हीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना धक्का दिला आहे. विशाखानं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून काही काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत तिनं पोस्ट शेअर केली आहे.
स्किट व्यतिरिक्त, वेगळ्या धाटणीचं थोडं काम करायचा विचार करत असल्याचं विशाखानं म्हटलं आहे. रसिकहो आजवर तुम्ही माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेम केलेत. त्याबद्दल खरच मनापासून आभार. हास्य जत्रेने मला खूप काही दिलंय आणि तुम्ही जत्रेवर नितांत प्रेम केलेत, असं विशाखानं म्हटलं आहे.
दरम्यान, लवकरच नव्या भूमिकेत दिसेन. माझ्यातल्या अभिनेत्रीच्या आणि नाटक निर्मातीच्या असंच पाठीशी रहा, असंही विशाखानं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पाहा पोस्ट –
थोडक्यात बातम्या –
“मुख्यमंत्री नाराज नाहीत, गृहखात्यामध्ये काही कमतरता असेल तर…”
गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांनी सोडलं मौन, म्हणाले…
“The Kashmir Files चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती”
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका?, अत्यंत धक्कादायक माहिती समोर
शिवसेनेला गृहखातं हवंय?, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
Comments are closed.