बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या ‘या’ नवीन मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट हळुहळु ओसरत चालली आहे मात्र अजूनही धोका टळलेला नाही. तज्ञांकडून तीसऱ्या लोटेविषयी संकेतही दिले जात आहेत. त्यामुळे कोरोना लसीकरण मोहित राबवल्या जात आहेत. अशातच गर्भवती महिलांसाठी कोरोना लस कितपत सुरक्षित आहे याविषयी आरोग्य मंत्रालयानं नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत.

कोरोना लस सुरक्षित आहे आणि कोरोनापासून गर्भवती महिलांचे संरक्षण करते. कोणत्याही औषधाप्रमाणेच, लसीचे काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात, जे सहसा सौम्य असतात. जसं की सौम्य ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना होणं किंवा लसीकरणानंतर 1-3 दिवसांपर्यंत अस्वस्थता जाणवते, असं आरोग्य मंत्रालयानं नव्या मार्गदर्शक सुचनांमध्ये सांगितलं आहे.

आरोग्य मंत्रालयानं सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटलं की, बहुतेक गर्भवती महिलांना कुणालातरी संपर्क साधल्यास संसर्ग होईल किंवा त्यांना सौम्य आजार असेल पण त्यांचे आरोग्य झपाट्याने कमी होऊ शकते आणि त्यामुळे गर्भावरही परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, लसीकरणानंतर 20 दिवसात फारच कमी गर्भवती महिलांमध्ये काही लक्षणे दिसू शकतात, ज्यावर त्वरित लक्ष देण्याची गरज असते. त्याचबरोबर जर एखाद्या महिलेस गर्भधारणेदरम्यान कोरोनाची लागण झाली असेल, तर प्रसूतीनंतर लगेचच लसीकरण करावे. जर गर्भवती महिलेला विषाणूची लागण झाली तर त्यातील 90 टक्के रुग्णालयात दाखल न करताच बरे होतात, तर काहींच्या आरोग्यामध्ये झपाट्याने घट होऊ शकते, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

“मराठा समाज शरद पवारांच्या गाड्यांमागे धावला त्यांनी मराठा समाजाला काय दिलं?”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 मध्ये क्लीन बोल्ड होणार”

‘कोविशिल्ड’ लस घेतलेल्या भारतीयांना ‘या’ देशात जाण्यास अडचणी, पुनावाला म्हणाले….

गरोदरपणातील कपड्यांची अनुष्का शर्मा करणार विक्री

एकेकाळी सर्वाधिक कोरोना मृत्युदर असणारा ‘हा’ देश बनला युरोपातला पहिला मास्क फ्री देश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More