खेळ

न्युझीलंडविरुद्ध ही कामगिरी फक्त सेहवागला जमली आणि आता हिटमॅनला!

माऊंट मोऊनगुई | भारत आणि न्युझीलंडच्या आज झालेल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने 96 चेंंडूत 87 धावा केल्या. रोहितने या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत.

त्यामुळे तो न्युझीलंडध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विरेंद्र सेहवागसह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आला आहे. 

दुसऱ्या स्थानावर 14 षटकारांसह भारताचा यष्टिरक्षक फलंदाज एम एस धोनी पोहोचला आहे. त्याने आजच्या सामन्यात 5 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 48 धावा केल्या आहेत.

दरम्यान, भारताने सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला आहे. या सामन्यात कुलदीप यादवने 4 बळी घेत, न्युझीलंडच्या खेळाडूंना आपल्या तालावर नाचवलं.

एकदिवसीय सामन्यात न्युझीलंडमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय क्रिकेटपटू-

रोहित शर्मा- 16 षटकार 11 सामनेे

विरेंद्र सेहवाग- 16 षटकार 12 सामने

एम एस धोनी- 14 षटकार 14 सामने

सुरेश रैना- 13 षटकार 10 सामने

सचिन तेंडूलकर- 12 षटकार 22 सामने

महत्वाच्या बातम्या-

-“बंटी पाटील, हसन मुश्रीफ यांना मी स्वप्नात दिसतो”

-ठाकरे की मणिकर्णिका??? पहिल्या दिवशी कुणाची कमाई जास्त…

धोनीनं पुन्हा दाखवून दिलं, स्टंपच्या मागं एकच बाप…

-जाॅन अब्राहमच्या ‘राॅ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, पाहा व्हीडिओ-

-हिमांशसोबतच्या ब्रेकअपनंतर नेहा कक्कड म्हणते, मला हा अभिनेता आवडतो!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या