“पन्नास लाखांच्या घड्याळात ज्यांचं टायमिंग चुकलं ते आता…”
मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये दिवसेंदिवस संघर्ष वाढताना दिसत आहे. रखडलेल्या महापालिका निवडणुकांवरून आता भाजप महाविकास आघाडीवर जास्त टीका करत आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईत जलपर्णीमुळं होत असलेल्या त्रासावरून शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
नाल्यांना जलपर्णीचा पुर्ण विळखा पडला आहे तुम्ही नवीन शेती तर केली नाही ना, असा सवाल शेलार यांनी शिवसेनेला केला आहे. शेलार सध्या मुंबईतील पश्चिम उपनगर भागातील मालाड ते दहिसर परिसरात पाहणी करत आहेत. त्यांच्या पाहाणी दौऱ्यामुंळ काम करण्यात येत असल्याची टीका शेलार यांनी केली आहे.
आम्ही दौरे करायला लागताच पन्नास लाखांच्या घड्याळात ज्यांचं टायमिंग चुकलं ते आता जागे झाले, अशी टीका शेलार यांनी केली आहे. कामांना गती देण्याची गरज असताना देखील प्रशासन दिहंगाई करत असल्याची टीकाही शेलार यांनी केली आहे.
दरम्यान, भाजपनं दौरा करताच पालकमंत्र्यांनी दौरा जाहीर केल्याचं वाचनात आलं आहे, असं म्हणत शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर देखील टीका केली आहे.
थोडक्यात बातम्या –
“ठाकरे सरकार हे जगातील सर्वात भ्रष्ट सरकार, शरद पवारांच्या…”
मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंना दिलासा नाहीच; 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी वाढवली
किरीट सोमय्यांना अटक होणार?; न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
अनुष्का शर्माला आवडली हिरव्या वाटाण्याची भाजी अन् आळूची वडी; फोटो शेअर करत म्हणाली…
“शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यास ठाकरे सरकार जबाबदार”
Comments are closed.