मुंबई | वर्षपूर्तीच्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली. त्यामध्ये कुणाच्या मागे हात धुवून लागू यावर मुलाखतीचा भर होता. अशा प्रकारचे भांडण नाक्यावर होतं. वर्षपूर्तीच्या निमित्ताने होत नाही. अशा प्रकारे चिरडण्याची भाषा ज्यांनी ज्यांनी केली ते फार काळ टिकले नाहीत,अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
भाजपकडून ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कारभाराची पोलखोल करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, “महाविकासआघाडी सराकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सामनाला मुलाखत दिली, पण त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार याबद्दल व्हिजन आवश्यक होतं. परंतू ते दिसलंच नाही”.
मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकूण होतो. पण दसरा भाषण असो की काल वर्षपूर्तीच्यानिमित्तांने सामनाला दिलेल्या मुलाखतीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयमी नसल्याचे दिसून आल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला- उपमुख्यमंत्री अजित पवार
भारत भालके यांचं निधन चटका लावणारं; कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपलं- शरद पवार
“गोरगरिबाचं पोरगं राजकारणात येऊन यशस्वी होऊ शकतं, हे आपण सिद्ध करुन दाखवलं”
राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे निधन
“मतदारसंघाच्या विकासासाठी भालके नेहमी धडपड करायचे; महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावला”