बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; पाहा तुमच्या भागात किती?

मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या 2091 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 36 हजार 4 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज 1168 रुग्ण बरे होवून घरी गेले असून आतापर्यंत 16 हजार 954 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात  आत्तापर्यंतच्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 54 हजार 758 एवढी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 90 हजार 170 नमुन्यांपैकी 54 हजार 758 जणांचे नमूने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 67 हजार 622 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 35 हजार 200 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 97 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या 1792 झाली आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी 35 मृत्यू हे मागील दोन दिवसातील आहेत. तर उर्वरित दोन मृत्यू हे 17 एप्रिल ते 23 मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 62 मृत्यूपैकी मुंबईचे 19, ठाण्याचे 15, कल्याण-डोंबीवलीचे 9, सोलापूरचे 6, मिरा-भाईंदरचे 5, उल्हासनगरचे 3, मालेगाव मधील 3 तर पुण्यातील एक आणि औंरगाबादमधील 1 मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 39, पुण्यात 8, ठाणे शहरात 15, औरंगाबाद शहरात 5, सोलापूरात 7, कल्याण डोंबिवलीमध्ये 10, मीरा-भाईंदरमध्ये 5, मालेगाव आणि उल्हासनगर मध्ये प्रत्येकी 3, नागपूर शहरात 1, रत्नागिरीमध्ये 1 मृत्यू झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 63 पुरुष तर 34 महिला आहेत. आज झालेल्या 97 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 37 रुग्ण आहेत तर 49 रुग्ण हे वय वर्षे ४० ते 59 या वयोगटातील आहेत. तर 11 जण 40 वर्षांखालील आहे. या 97 रुग्णांपैकी 65 जणांमध्ये (67 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.\

मुंबई महानगरपालिका : 32,974 (1065)

ठाणे : 484 (5)

ठाणे मनपा : 2866 (52)

नवी मुंबई मनपा : 2154 (32)

कल्याण डोंबिवली मनपा : 989 (18)

उल्हासनगर मनपा : 198 (6)

भिवंडी निजामपूर मनपा : 99 (3)

मीरा भाईंदर मनपा : 525 (10)

पालघर :122 (3)

वसई विरार मनपा: 630 (15)

रायगड : 471 (5)

पनवेल मनपा : 374 (12)

ठाणे मंडळ एकूण : 41,886 (1226)

नाशिक : 123

नाशिक मनपा : 147 (२)

मालेगाव मनपा: 722 (47)

अहमदनगर : 64 (5)

अहमदनगर मनपा : 20

धुळे : 29 (३)

धुळे मनपा : 100 (6)

जळगाव : 324 (36)

जळगाव मनपा : 123 (5)

नंदूरबार : ३२ (2)

नाशिक मंडळ एकूण : 1684 (106)

पुणे : 383 (7)

पुणे मनपा: 5602 (268)

पिंपरी चिंचवड मनपा: 350 (7)

सोलापूर: 25 (2)

सोलापूर मनपा:621 (47)

सातारा: 339 (5)

पुणे मंडळ एकूण: 7320 (336)

कोल्हापूर:312 (1)

कोल्हापूर मनपा: 28

सांगली: 76

सांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१)

सिंधुदुर्ग: 19

रत्नागिरी: 171 (5)

कोल्हापूर मंडळ एकूण : 617 (7)

औरंगाबाद : 26 (1)

औरंगाबाद मनपा : 1284 (52)

जालना: 73

हिंगोली: 133

परभणी: 19 (1)

परभणी मनपा: 6

औरंगाबाद मंडळ एकूण : 1541(54)

लातूर: 74 (3)

लातूर मनपा : 8

उस्मानाबाद: 37

बीड: 32

नांदेड: 19

नांदेड मनपा: 86 (5)

लातूर मंडळ एकूण : 256 (8)

अकोला: 39 (2)

अकोला मनपा: 398 (15)

अमरावती: 16 (2)

अमरावती मनपा: 177 (12)

यवतमाळ: 115

बुलढाणा :49 (3)

वाशिम: ८

अकोला मंडळ एकूण:802 (34)

नागपूर: 9

नागपूर मनपा: 472 (8)

वर्धा: 7 (1)

भंडारा: 14

गोंदिया: 47

चंद्रपूर: 16

चंद्रपूर मनपा: 9

गडचिरोली: 26

नागपूर मंडळ एकूण : 600 (9)

इतर राज्ये: 52 (12)

एकूण 54 हजार 758 (1792)

ट्रेंडिंग बातम्या-

पियूष गोयल यांचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले….

“ठाकरे सरकारला फडणवीसांच्या सल्ल्याची गरज नाही, त्यासाठी त्यांनी एखादी कंपनी उघडावी”

महत्वाच्या बातम्या-

“आपलेच आपले सोडून जाऊ नये यासाठी किती ओरडावं लागतं ना…”

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; पाहा तुमच्या भागात किती?

पुण्यात आज 140 रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी, वाचा किती नव्या रूग्णांची झालीये नोंद…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More